सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (17:03 IST)

कृष्ण आणि राक्षसी पुतना

कृष्णाचे मामा कंस त्याला मारण्यासाठी हतबल होते, म्हणून त्यांनी हे काम 'पुतना' नावाच्या एका राक्षसिणीकडे सोपवले. राक्षसिणीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि ज्या खोलीत कृष्ण होता त्या खोलीत गेली.
 
तिने तिच्या स्तनांवर विषाचा लेप केला होता आणि कृष्णाला तिचे दूध पाजण्याची विनंती केली होती. कृष्णाच्या आईला तिचा खरा हेतू माहित नव्हता आणि त्यांनी पुतनाला दूध पाजण्याची परवानगी दिली. 
 
पुतानाचे स्तन विषाने भरले होते. अंतर्यमी श्री कृष्णाला सर्व कळले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी स्तन पकडून जीवासहित दूध पिण्यास सुरुवात केली. यामुळे पुतनाला खूप वेदना जाणवू लागल्या तिचे प्राण निघू लागले. ती ओरडू लागली- “अरे मला सोडून द्या ! 
 
सोडा मला! बस्स करा ” ती हात-पाय आदळू लागली तिचे डोळे फाटू लागले. तिच्या पूर्ण शरीरातून घाम फुटू लागला. ती अतिशय भयंकर स्वरात ओरडू लागली. अशात ती मनोहर ते राक्षसी स्वरुपात प्रकट झाली आणि तिचा मृत्यू झाला. 
 
यशोदा, रोहिणी आणि इतरगोपींनी त्याच्या पडण्याचा भयंकर आवाज ऐकला, मग त्या तिच्याकडे धावल्या. त्यांनी बाल कृष्णाला पूतनाच्या छातीवर स्तनपान करताना बघितले आणि राक्षसीचा मृत देह बघितला. त्यांनी बाळाला लगेच उचलून घेतलं. विषाने कृष्णाचे काही नुकसान केले नाही, परंतु कृष्णाला दूध पाजरण्याच्या चांगल्या कृत्यामुळे पुतानाचा आत्मा मुक्त झाला.
 
धडा - हेतुपुरस्सर कधीही कोणालाही दुखवू नका, कारण त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते.