बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (08:20 IST)

साथ माझी तुला प्रिये

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल.
प्रेमाच्या या सरितेत
वाहत असेच जावे
उगवत्या सुर्यासोबत
प्रेम सागरास जावून मिळावे
प्रेम म्हणजे… ?
समजली तर भावना…
पाहिले तर नाते…
म्हटले तर शब्द…
वाटली तर मैत्री…
घेतली तर काळजी …
तुटले तर नशीब….
पण मिळाले तर स्वर्ग….!!!
घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.
तू आहेस सोबत म्हणूनच
शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी
कित्येक दिवस पाहिले आहेत.
नयन ओले माझे
तुझ्या आठवणींच्या ओलाव्यात
शांत होते मन
पाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.
आठवून तुला
मनाचा दर्पण सजला
पाहून तुझी सुंदरता
तो क्षणही लाजला.
पाऊस थांबला होता
अश्रू थांबत नव्हते
विरहाचा भार ते
स्वतः झेलत होते..