मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

लग्नासाठी मॅच्युरिटी गरजेची!

म्हणतात ना! वर- वधु यांच्या ब्रम्हगाठी ह्या देवा घरीच बांधलेल्या असतात. आपल्या जीवनात अनेक सुख- दु:खाचे टप्पे येतात. त्यातील सगळ्यात महत्त्वांचा टप्पा म्हणचे विवाहाचा होय. प्रत्येकजण एका 'परफेक्ट लाइफ पार्टनर'च्या शोधात असतो. मात्र तो शोधत असताना स्वत:मध्ये व समोरिल व्यक्तीत मॅच्युरिटी असणे फार गरजेची आहे. विवाह झाल्यानंतर काही दिवसातच काडीमोड होण्यामागील ते एक महत्त्वाचे कारण असू शकते.

समाजात पूर्वी मुलगी 18 वर्षाची होण्याआधीच तिचे लग्न लावून द्यायचे. लग्नासाठी ती शाररीक तसेच मानसिक परिपक्व आहे किंवा नाही, असे काहीच पाहिले जात नव्हते. मुलगी ही परकी असते. तिला सासरी जावे लागत असल्याने तिचा शिक्षण काय कामात येईल. अशी त्या काळची समाजात विचारधारणा होती. मात्र आता काळ बदलला आहे. विवाहाला आता कायद्याचे कुंपन घालण्यात आले आहे. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 विवाहासाठी योग्य असल्याचे ठरवून देण्यात आले आहे. मात्र असे ठरवून देखील घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे दोघांमध्ये असलेला मॅच्युरिटीचा अभाव होय.

विवाह नि‍श्चित करताना आवड तर महत्त्वाची आहेच. मा‍त्र मुलगा- मुलगीमध्ये किती वर्षांचे अंतर आहे, हे देखील पाहणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यात बांधली गेलेली ब्रम्हगाठ अधिक घट्ट होत असते. जर वर आणि वधु यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंतर असेल तर त्यांच्या विचारात दरी निर्माण होते. भविष्यात ही दरी त्यांच्यातील नात्यामधील प्रेमाचा ओलावा कमी करत असते.

भारतीय समाजात विवाहावरून आज गैरसमज आहेत. वर हा जास्त वयाचा असतो मात्र त्याची वधु ही त्याच्या तुलनेत फारची कमी वयाची असते. त्यामुळे त्यांचा संसार रुपी रथ काही दिवसातच डगमगतो व पुढे जाण्याचे नावच घेत नाही. 

'विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा व मुलगी हे दोनही महत्त्वपूर्ण घटक असता‍त. कमी वयात विवाह झाला असेल तर त्याचा प्रभाव आपल्या भावी आयुष्यावर पडणार यात शंका नाही.

मुलगा व मुलगी यांच्या वयात पाच ते सहा वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावे. हे विवाह निश्चित करण्यापूर्वी आई- वडिलांनी तसेच मुला-मुलींने ही पाहणे आवश्यक आहे.