आंबा आणि दही पासून बनवा बेक्ड मँगो योगर्ट रेसिपी
नेहमी तेच तेच गोड खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ट्राय करा, दही आणि आंब्याची ही मस्त रेसिपी, जिचे नाव आहे बेक्ड मँगो योगर्ट रेसिपी.
साहित्य-
150 ग्रॅम दही
100 ग्रॅम आंब्याचा रस
50 ग्रॅम फ्रेश क्रीम
80 ग्रॅम घट्ट दूध
कृती-
एका बाऊलमध्ये दही घ्यावे व त्यामध्ये आंब्याचा रस घालून ते चांगले मिक्स करावे. आता बाऊलमध्ये कंडेंस्ड मिल्क आणि फ्रेश क्रीम टाकून व्हिस्करच्या मदतीने फेटून घ्यावे.
आता हे मिश्रण माइक्रोवेव सेफ बाउल मध्ये ठेवावे आणि बाउलला केक टिन किंवा ट्रे च्या वरती ठेवा. बाउल कोएल्युमिनियम फॉयलने झाकून घ्या.
आता केक टिन मध्ये अर्धा बाउल पाणी भरावे. आता याला 180 डिग्री सेल्सियस वर 35 मिनिटासाठी बेक करावे.
35 मिनट नंतर बाउल बाहेर काढावा आणि फॉयल काढून टाका.
2 तासांसाठी बेक्ड योगर्टला फ्रिज मध्ये थंड करण्यासाठी ठेवावे आणि नंतर सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik