शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (23:34 IST)

Vastu Tips : फक्त तुळसच नाही तर ही वनस्पती देखील खूप शुभ मानली जाते

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानले जाते, अनेक घरांमध्ये तिची पूजाही केली जाते. पण तुळशीशिवाय आणखी एक वनस्पती आहे जी घरात लावणे खूप फायदेशीर आहे, ती म्हणजे शमीची वनस्पती. हे रोप घरात लावल्याने सुख-समृद्धी तर मिळतेच पण पैशाची कमतरताही दूर होते. तसेच शमीचे रोप लावल्याने शनिदेवाचा प्रकोपही टाळता येतो.
 
पैशाची टंचाई दूर होते 
शमीचे रोप भगवान शंकराला सर्वात प्रिय मानले जाते आणि वास्तूनुसार, ते घरात लावल्याने सुख-समृद्धी येते तसेच पैशाची टंचाई दूर होते. या वनस्पतीमुळे तुमच्या घरातील कलहही संपुष्टात येऊ शकतो आणि असे मानले जाते की या रोपाची लागवड केल्याने शनिची साडेसाती आणि ढैय्याचे  दुष्परिणाम टाळता येतात. याशिवाय विवाहाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही ही वनस्पती प्रभावी मानली जाते.
 
हे रोप लावण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, शनिवारी या रोपाची लागवड करणे फायदेशीर मानले जाते आणि विशेषत: दसऱ्याच्या दिवशी ते अधिक शुभ मानले जाते. हे पूजनीय रोप लावण्यासाठी स्वच्छ मातीचा वापर करावा. 
 
या वनस्पतीची पूजा करा
शमीचे रोप कधीही घरामध्ये लावू नये. ते नेहमी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा आणि घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला असलेल्या दिशेला असावे. म्हणजे मुख्य गेटच्या डाव्या बाजूला रोप लावणे शुभ असते. जर तुम्हाला हे रोप मुख्य गेटवर लावायचे नसेल किंवा वरच्या मजल्यावर राहात असाल  तर तुम्ही दक्षिण दिशेला टेरेसवर लावू शकता. तसेच, सूर्यप्रकाशासाठी छताच्या पूर्व दिशेला लागवड करता येते.
 
रोपाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संध्याकाळी घराच्या मंदिरात दिवा लावल्यानंतर शमीच्या रोपाचीही पूजा करावी. तसेच, रोपासमोर दिवा लावा. असे मानले जाते की यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि फालतू खर्च देखील कमी होतो.
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)