गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (17:13 IST)

प्रजासत्ताकदिन विशेष रेसिपी : तिरंगी ढोकळे नारळाच्या चटणी सह

साहित्य- 
 
125 ग्रॅम चणा किंवा हरभरा डाळ, 125 ग्रॅम मूग डाळ,100 ग्रॅम तांदूळ, 100 ग्रॅम उडीद डाळ, चिमूटभर हिंग,हळद , एक लिंबाचा रस,250 ग्रॅम मटार, 6 हिरव्या मिरच्या, 1 आलं,1 मोठा चमचा तेल, 1 /2 नारळ खवलेलं, 2 जुडी कोथिंबीर, 4 ते 5 पानें कढीपत्ता,2 मोठे चमचे मोहरी, मीठ चवीप्रमाणे,3/4 कप पाणी,अडीच चमचा फ्रुट सॉल्ट .
 
 
कृती -
 
किमान 3 तास वेग वेगळ्या डाळी आणि तांदूळ भिजत घाला. मटार हिरव्यामिरच्या आणि आलं वाटून घ्या. मटार तेलात परतून त्यामध्ये मीठ घाला. तांदूळ जाड आणि उडीद डाळ बारीक दळून मिसळून घ्या. त्यात मीठ,पाणी आणि फ्रुट सॉल्ट मिसळा. 
 
हरभराडाळ आणि मुगाची डाळ एकत्र दरीदरीत वाटून घ्या. त्यात मीठ, हळद, हिंग, फ्रुटसॉल्ट लिंबाचा रस आणि पाणी घाला. आता ह्या घोळाला ढोकळ्याच्या संचाला तेल लावून मिश्रणाचा 1 इंच जाडसर थर लावून 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्या. ह्याला काढून या वर मटारची पेस्ट पसरवून द्या. या वर डाळ तांदुळाची केलेली पेस्ट अर्धा इंच जाडसर थर पसरवून वाफ द्या. आणि  थंड करून घ्या. 

थंड झाल्यावर ह्याचे चौरस काप कापून कढईत तेल तापत ठेवून त्यात मोहरी, कढीपत्ता ची फोडणी  या ढोकळ्यावर घाला. तिरंगे ढोकळे खाण्यासाठी तयार.वरून खवलेल्या नारळ आणि कोथिंबिरीने सजवा. हे ढोकळे नारळाच्या चटणीसह सर्व्ह करा.