गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (22:40 IST)

शलजमचे चविष्ट भरीत

आपण भाज्या खाऊन कंटाळला असाल तर शलजमचे भरीत करून बघा.हे बनवायला सोपे आहे आणि आरोग्यदायी देखील आहे.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
 
4 शलजम, 2 टोमॅटो,2 हिरव्या मिरच्या,आलं,1/2 कप मटार दाणे,2-3 चमचे तेल, चिमूटभर हिंग,1/4 चमचा हळद ,1/4 चमचा धणेपूड,1/2 चमचा तिखट,1/2 चमचा गरम मसाला,1 चमचा साखर,1/2 चमचा जिरे,मीठ चवीप्रमाणे,कोथिंबीर,1 लिंबू.
 
कृती -
शलजम चिरून घ्या.टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बनवा.कुकर तापवायला ठेवा,त्यात तेल,जिरे,हिंग,आल्याची पेस्ट, कोथिंबीर,हळद,तिखट,शलजमचे काप घाला.शलजम मसाल्यामध्ये परतून घ्या.लागत लागत पाणी घाला.कुकरचे झाकण लावा.1 शिट्टी देऊन कुकर बंद करा.
 
आता मसाला तयार करा.त्या साठी एका कढईत एक चमचा तेल घालून त्यात जिरे,हळद,तिखट,कोथिंबीर ,टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला.मसाला पसरतून घ्या त्यात मटारचे दाणे,साखर,मीठ,घाला.
 
आता शलजम कुकरमधून काढून मॅश करा.आणि कढईत तयार केलेल्या मसाल्यात घाला आणि चांगले परतून घ्या.2 ते 3 मिनिट शिजवा आणि वरून कोथिंबीर,गरम मसाला आणि लिंबाचा रस घाला.गरम शलजमचे भरीत पोळ्यासह सर्व्ह करा.