शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (09:46 IST)

गणेश चतुर्थी अगोदरच लाल बागच्या राजाची पहिली झलक

गणेश चतुर्थी अगोदरच लाल बागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहताना गणेशभक्तांमधील उत्साह ओसंडून वाहत होता.

येत्या ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाची धूम असणार आहे. मुंबईसह सर्वच गणेश मंडळांनी त्यासाठी खास तयारी केली आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. याच कारणामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो गणेशभक्त येथे हजेरी लावतात. दरम्यान, (२९ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक सार्वजनिक करण्यात आली. यावेळी गणेश भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत गणेशाचे स्वागत केले.