शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 जुलै 2021 (11:09 IST)

मुंबईत चार मजली इमारत कोसळली

मुंबईत आज मध्यरात्री अंधेरी पश्चिम मधली मेहता बाबा चाळ ही चार मजली इमारत कोसळली.या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 5 जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले आहे.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे.
 
अंधेरीत असलेल्या या इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही इमारत जवळच्या घरांवर कोसळली.या अपघातात अकबरशेख,चांद शेख,अजरा शेख,शमशुद्दीन शेख असे जखमी झाले आहे. त्यांना ताबडतोड उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी माहिती मिळतातच अग्निशमनदलाच्या जवानांनी धाव घेतली असून मदतकार्ये सुरु केली.