मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (22:11 IST)

बाप्परे, १५ महिन्यांच्या चिमुकलीला काकूकडून अमानुष मारहाण

मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकूकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कॅमेर्‍यात मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाला आहे.मिरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिरारोडच्या नया नगर परिसरात शेख कुटुंबिय राहतात.तक्रारदारांना १५ महिन्यांची मुलगी आहे.घरात तिचा दिर आणि जाऊ रहाते.चिमुकलीच्या शरिरावर काही दिवसांपासून मारहाणीचे वळ आणि जखमा आढळून येत होत्या. मात्र त्याचा उलगडा अस्मा यांना होत नव्हता.खेळताना ती पडली असेल असे तिला वाटायचे. तिने घरात मोबाईल कॅमेरा लपवून ठेवला होता.त्यावेळी त्यांची जाऊ मुलीला अमानुष मारहाण करत असतान दिसून आली.याबाबत त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारी नंतर पोलिसांनी आरोपी रेश्मा शेख हिच्या विरोधात बाल न्याय अधिनियमाच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
”मी खोलीबाहेर जायची तेव्हा माझ्या मुलीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसायच्या आणि ती रडायची.मला संशय आला होता परंतु पुरावे नव्हते. त्यामुळे मी मुलगी जिथे झोपते तिथे कॅमेरा लपवून ठेवला आणि हा प्रकार समोर आला.”,असे पीडित मुलीची आईने सांगितले.