1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (00:12 IST)

मोठी बातमी! महाराष्ट्रात 318 परदेशी आले त्या पैकी12 बेपत्ता

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्यात महाराष्ट्रातील ठाण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की परदेशातून नुकतेच परतलेल्या 318 पैकी 12 लोकांचा शोध अद्याप लागलेला नाही. हे सर्वजण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे 10 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील ओमिक्रॉन संसर्गाचे हे सर्वाधिक प्रकरण आहे. मंगळवारी, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशातून परतलेल्या 318 पैकी किमान 12 प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे पालिकेचे प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते म्हणाले, "परत आलेल्या काही प्रवाशांचे मोबाईल फोन बंद असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, तर इतरांनी दिलेले पत्तेही चुकीचे आहेत," असे ते म्हणाले.
केडीएमसी प्रमुखांनी सांगितले की, आरोग्य विभागाचे एक पथक पुन्हा दिलेल्या पत्त्यावर जाईल. गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि आंध्रप्रदेशसह इतर राज्यांतूनही परदेशातून परतणाऱ्यांचे असेच अहवाल आले आहेत.
कोविड-19, ओमिक्रॉनची नवीन आवृत्ती 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) प्रथम कळवण्यात आली. 26 नोव्हेंबर रोजी WHO ने कोविड-19 विषाणूच्या नवीन प्रकाराला B.1.1.1.529 असे नाव दिले, ज्याला सामान्य भाषेत ओमिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.