शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (12:46 IST)

Video मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसली

irst electric double decker bus
मुंबई- देशातील पहिल्या वातानुकूलित डबल-डेकर इलेक्ट्रिक बससह दोन इलेक्ट्रिक बस गुरुवारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बस आणि अॅप आधारित प्रीमियम बस सेवेसाठी डबल डेकर वातानुकूलित बस दक्षिण मुंबईतील NCPA येथे आयोजित कार्यक्रमात लॉन्च करण्यात येणार आहेत.
 
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान कॉफी टेबल बुकसह दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. मात्र, कार्यक्रमापूर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या डबल डेकर बस आणि निळ्या रंगाच्या सिंगल डेकर बसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बसचे निर्माते गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळील एका कार्यक्रमात त्यांचे अनावरण करतील आणि नंतर त्या बेस्ट उपक्रमाकडे सुपूर्द करतील. विविध टप्प्यात 900 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट बेस्टने एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यापैकी 50 टक्के बसेस मार्च 2023 पर्यंत आणि उर्वरित 50 टक्के बसेस त्यानंतर येणे अपेक्षित आहे.
 
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा प्रदात्याने शहरात प्रीमियम अॅप-आधारित सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची योजना आखली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्यांची जागा बुक करावी लागेल. मात्र, त्यांना या प्रीमियम सेवेसाठी पारंपरिक बसेसच्या तुलनेत जास्त भाडे द्यावे लागू शकते.