शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:16 IST)

बेकायदेशीरपणे भिवंडीत राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक

मुंबई येथील भाग असलेल्या भिवंडी परिसरात  म्हणजेच आपल्या देशात   भारतात छुप्यापद्धतीने  मार्गाने येऊन शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना पोलिसानी  अटक केली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे वास्तव्यास राहून अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यांनतर  भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल छापा टाकला असता हे नऊ बांग्लादेशी नागरिक कामगार म्हणून आढळून आले आहे.  या नऊ जणांकडून बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पासबूक जप्त करण्यात आले.
भारतात छुप्या मार्गाने येऊन भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना एका टेक्सस्टाईल कंपनीवर छापा मारून  पोलिसांनी अटक केली आहे. सलीम अमीन शेख( 30), रासल अबुल हसन शेख (27), मो.शाहीन मोहम्मद अकबर अली शेख (24), मोहम्मद मासुम शोयदुल्ला इस्लाम(21), तरुणमणीराम त्रिपुरा (21), सुमनमनीराम त्रिपुरा (21), इस्माईल अबुताहेर खान (19), आजम युसूफ  खान (19), मोहम्मद आमीर अबुसुफियान (26) अशी गजाआड  करण्यात  आलेल्या  बांगलादेशी  नागरिकांची  नावे आहेत.