रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:17 IST)

GST भरायला नकार द्या, नरेंद्र मोदींच्या भावाचं व्यापाऱ्यांना आवाहन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करत म्हटलं की,"वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी भरायला नकार द्या,पंतप्रधानांसह मुख्यमंत्री तुमच्याकडे येतील."

मुंबईजवळील उल्हासनगर इथं व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं प्रल्हाद मोदी बोलत होते.
 
"रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील," असं प्रल्हाद मोदी म्हणाले.प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्षही आहेत.