गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:48 IST)

रिक्षात बसलेल्या पत्नीने बोलण्यास नकार दिला, पतीने भर रस्त्यात हत्या केली

ऑटोरिक्षात बसलेल्या पत्नीने पतीशी बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची हत्या केली. चेंबूरच्या अशोक नगरमध्ये झालेल्या या हत्येने लोक हादरले आहेत. आरसीएफ पोलिसांनी आरोपी पती अक्षयला अटक केली आहे.
 
आकांक्षाला तिचा २१ वा वाढदिवस साजरा करून एक आठवडा झाला होता. आकांक्षा हिच्या हत्येने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आकांक्षा खरटमल यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोघेही खूप आनंदात होते, पण लवकरच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. लग्नानंतर चार महिन्यांनी आकांक्षा माहेरी राहू लागली.
 
बुधवारी सकाळी आकांक्षा कुठेतरी जात होती. अक्षयने दुचाकीवरून रिक्षाचा पाठलाग करत अशोक नगरमधील मधल्या रस्त्यावर ऑटोरिक्षा थांबवली. त्यानंतर तो रिक्षात बसण्याचा प्रयत्न करू लागला. अक्षयला काहीतरी बोलायचे होते, पण आकांक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अक्षयने आकांक्षा हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला.
 
तिला जखमी अवस्थेत सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केले गेले पण तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहे.

photo: symbolic