शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:28 IST)

आरोग्य संवर्धनासाठी ठाणेकरांचा पुढाकार, ‘मॉर्निग वॉक’साठी तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद

ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. या अनोख्या योजनेमुळे ठाणेकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळेमध्ये होणाऱ्या सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सेवा रस्ता , उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्र मांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाटयगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी केली आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ प्रभात फेरी योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणाऱ्यानाच  प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.