शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (08:54 IST)

मुंबईकरांनो २४ तासांसाठी ‘या’ भागात पाणीकपात

water tap
जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागातील गोरेगाव, विलेपार्ले,घाटकोपर, कुर्ला, भांडुप, मरोळ- मरोशी, असल्फा, सांताक्रूझ, खार या भागात काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, गोरेगाव, बिंबीसार नगर, धारावी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
 
त्यामुळे नागरिकांनी सदर काम सुरू होण्यापूर्वीच आवश्यक पाणी भरून व त्याचा साठा करून काळजीपूर्वक पाणी वापरावे. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे. मात्र ठरलेल्या कालावधीत अथवा त्यापूर्वी काम झाल्यानंतर खंडित पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
 
मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor