बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चेन्नईमध्ये 11 वर्षाच्या मुलीसोबत 7 महिन्यांपर्यंत बलात्कार, 18 जणांना अटक

तमिळनाडूची राजधानी चेन्नई स्थित एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 11 वर्षाच्या एका मुलीसोबत अनेक महिन्यांपर्यंत बलात्कार केल्याचा आरोपात 18 लोकांना अटक केली गेली आहे, यात बिल्डिंगचा सिक्योरिटी गार्ड देखील सामील आहे.
 
मुलीला कोल्ड ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून किंवा बेशुद्ध करण्याचे औषध दिले जात होते. पोलिसांप्रमाणे तिला ब्लॅकमेल ही केलं जात होतं. अटक केलेल्या लोकांमध्ये बिल्डिंगचा लिफ्टमेन आणि वॉटर सप्लायर देखील सामील आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की पीडिताच्या बहिणीने याबद्दल सांगितल्यावर प्रकरण उघडकीस आले. नंतर तरुणीने आपल्या नातेवाइकांना याबद्दल माहिती दिली आणि पोलिसात तक्रार नोंदवली.
 
मुलीच्या आईने तक्रार केली की जवळपास 15 लोकांनी वेगवेगळ्या दिवशी अपार्टमेंटमध्ये विभिन्न स्थळी मुलीसोबत बलात्कार केला. पोलिस तपास करत आहे.