गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (17:15 IST)

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.आता मात्र हे सीसीटीव्ही फुटेज डिलिट झाल्याची माहिती अपोलो रूग्णालयाने न्या. ए अरूमुघस्वामीच्या आयोगाला दिली आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ३० दिवसांनी आपोआप डिलिट होते असे रूग्णालय प्रशासनाने आयोगाला सांगितले आहे. जयललिता यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज आता डिलिट झाल्याने आम्ही हे फुटेज आपल्यापुढे सादर करू शकत नाही असे रूग्णालयाने सांगितले आहे. यामुळे चौकशीचा मोठा दुवा निखळला आहे. याआधीही आयोगाने अपोलो रूग्णालयाला जयललितांना दाखल केल्या दिवसापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंतचे सगळे फुटेज गोळा करण्यास सांगितले होते.