बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (14:51 IST)

पत्नीची हत्या करुन मृतदेह झुडपात फेकलं, स्वत: केला पोलिसांना फोन

त्याने आधी आपल्या बायकोची हत्या केली, नंतर मृतदेह एका एकांत भागात झुडपात फेकून आला. नंतर स्वत:च पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. 
 
आरोपी दिल्ली रहिवासी असून घटना फरीदाबादमध्ये घडल्यामुळे या प्रकरणात दोन राज्यांच्या पोलिसांचा समावेश झाला.
 
नेमकं काय घडलं
दिल्लीच्या कालिंदी कुंज पोलिस स्टेशनवर एक कॉल आला. कॉल करणार्‍याने सांगितले की त्याने हत्या केली आहे. कॉलर म्हणाला की मी माझ्या पत्नीचं खून केला आहे. त्याने मृतदेह कुठे सापडेल हेही सांगितले. महिलेचं मृतदेह फरीदाबाद येथे होतं म्हणून फरीदाबाद पोलिसांना सूचना देण्यात आली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निजामुद्दीन रहिवासी जेतपूर दिल्ली याने आपल्या पत्नी रावियाचा 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चाकूने वार करुन खून केला. राविया दिल्ली सिव्हिल डिफेंसमध्ये नोकरी करत होती. या सूचनेच्या आधारावर पोलिस लगेच पाली रोड पोहचली आणि तेथे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली तर मेनरोडहून 10 ते 15 फुट आत झाडींमध्ये मृतदेह सापडला.
 
मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. आरोपीने महिलेला नोकरीसाठी मदत केली होती परंतु त्यांचं लग्न झालं आहे वा नाही याबद्दल पुरेशी माहिती नाही. परंतु आरोपीने सांगितलं की त्याने रावियासोबत जूनमध्ये कोर्ट मेरिज केली होती. परंतु याचे प्रमाण नाही.