गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:30 IST)

राम मंदिर प्रश्नासाठी न्यायालयावर अवलंबून राहू नका - सर संघचालक

राम मंदिर प्रश्नी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका स्पष्ट केली असून, राज्य देश हे फक्त कायद्याने नव्हे तर नागरिकांच्या भावनांवर चालत असते, त्यामुळच राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील जनतेला एकत्रपणे उभे राहण्याची हाक दिली असून, राम मंदिराचा पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी लोकांनी बराच काळ धीर धरला आहे, आता मात्र,ती वेळ गेली असून, राम मंदिराच्या उभारणीसाठी जनआंदोलन करायची गरज असल्याचे मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोणताही देश हा कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. त्यामुळे न्यायालयाने जनतेच्या भावना विचारात घेणे गरजेचे आहे.मात्र योग्य निवडा न देता न्यायालय सतत आपला निर्णय पुढे ढकलत आहे तेव्हा निर्णय जनतेने घ्यावा असे देखील भागवत यांनी स्पष्ट केले.