रामलीला दरम्यान, 'दशरथ'ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू , लोक अभिनयसमजून टाळ्या वाजवत राहिले

Last Modified रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)
बिजनौरमध्ये सप्तमी ते दसऱ्यापर्यंत रामलीला आयोजित केली जाते. रामायणातील पात्रे स्थानिक लोक साकारतात. यामध्ये गावाचे माजी प्रमुख राजेंद्रसिंह हे बराच काळापासून दशरथची भूमिका साकारत होते.

रामलीलाच्या मंचावर, रामच्या 14 वर्षांच्या वनवासातील प्रसंग सुरु होते.दु: खी मनाने मंचावर दशरथच्या भूमिकेत राजेंद्र संवाद बोलत असताना त्यांना
हृदयविकाराचा झटका आला. परिणामी, त्यांच्या मंचावरच मृत्यू झाला.

रामलीलाच्या मंचावर सिंहासनावर बसलेले, दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह, हातात माईक घेऊन संवाद बोलत असताना
अचानक ते मंचावर कोसळले , संवाद ऐकून प्रेक्षक देखील भावनिक झाले, त्यांना वाटले की ते त्यांच्या अभिनयाचाच एक भाग आहे आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. दरम्यान, रंगमंचाचा पडदा पडतो आणि काही काळानंतर प्रेक्षकांना कळते की रामलीलातील
दशरथने प्रत्यक्षात जगाला निरोप दिला आहे.

ही चित्रे बिजनौर जिल्ह्यातील रेहाड पोलीस स्टेशन परिसरातील हसनपूर गावात आयोजित केलेल्या रामलीलाची आहेत. रामलीलाच्या मंचावर भगवान रामांना 14 वर्षांसाठी वनवास झाला तेव्हा राजा दशरथ अस्वस्थ झाले. राजा दशरथाने आपले महान मंत्री सुमंत यांना या उद्देशाने भगवान रामसोबत जंगलात पाठवले होते की ते जंगलात फिरून रामाला परत आणतील, पण रामजी जंगलात थांबले आणि त्यांनी मंत्री सुमंत यांना परत पाठवले.
सुमंत राजा दशरथाकडे परत आल्यावर राजा दशरथ रामाला न पाहताच भावुक होतात. राजा दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मंचाचा पडदा पडला .राजेंद्रचे सहकारी कलाकार त्यांना जागे करण्याचा
प्रयत्न करतात, परंतु 20 वर्षांपासून दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह मरण पावले होते.संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली.या घटनेमुळे रामलीलातील पुढील प्रसंगें पुढे रद्द करण्यात येते. अभिनयाच्या दरम्यान, मृत्यूचा हा लाईव्ह व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोविडनंतर आता जगाला मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा ...

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले
बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

हवेतच विमानाचे इंजिन बंद

हवेतच विमानाचे इंजिन बंद
शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ...

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा
हैदराबादमध्ये 2019 मध्ये, एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या 4 आरोपींना ...

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
आजम खान 27 महिन्यांनंतर सीतापूर कारागृहातून बाहेर आले आहेत. काल म्हणजेच 19 मे रोजी ...