गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (15:58 IST)

राजसमंद येथे बांधकामाधीन इमारतीचे छत कोसळून चार जण ठार, 9 जखमी

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वाराच्या सायन  का खेड गावातील चिकलवास मध्ये एका खाजगी मालकीच्या सामुदायिक इमारतीचे छत कोसळून अपघात झाला. या अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या अपघातात 9 जण जखमी झाले आहे. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, चिकलवासच्या मेघवाल समाजाच्या एका सामुदायिक इमारतीच्या छताचे बांधकाम 20 दिवसांपूर्वीच झालं होत. सोमवारी रात्री इमारतीच्या खालील बाजूची स्वच्छता करताना छत कोसळली आणि कामगारांच्या अंगावर पडली. त्यात काही लोक गाडले गेले. अपघातानंतर गोंधळ  उडाला आरडाओरड होऊ लागला. 
अपघाताची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने गाडले गेलेल्या लोकांना वाचविण्याचे काम सुरु केले. दोघे जागीच ठार झाले तर दोघांचा उपचाराधीन असताना मृत्यू झाला. 

घटनास्थळी पोलीस आणि मोठे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी तपासणी केली. या अपघातात एकाच गावातील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.  
 
Edited By- Priya Dixit