शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:21 IST)

हिमाचल प्रदेश निवडणुक, 9 नोव्हेंबरला मतदान

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल आणि 18 डिसेंबर रोजी निकाल जाहिर होतील. हिमाचलमध्ये 68 जागांसाठी मतदान होणार असून सर्व मतदान केंद्रावर VVPAT अर्थात व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशिनचा वापर होणार आहे. आयोगाने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीचीही आज घोषणा होण्याची शक्यता होती मात्र आयोगाने अद्याप या तारखा जाहीर केलेल्या नाही. त्यांची घोषणा लवकरच होणार आहे. आयोगाने म्हटले आहे, की हिमाचलच्या निकालाचा परिणाम गुजरात निवडणुकीवर व्हावा अशी आमची इच्छा नाही. हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे तर गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे.