आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांच्या होम क्वारंटाइन काळात बिहार सरकार मजुरांना मोफत कंडोमचं वाटप करणार आहे.
बिहारमध्ये आल्यानंतर प्रत्येक कामगार व मजुरांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे काही दिवसही त्यांना होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. या काळात अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहोत. तसेच त्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत कंडोमही वाटत आहोत.
कुटुंब नियोजनासाठी कामगारांना मोफत कंडोमचं वाटप करण्यात येत असून त्याचा करोनाच्या प्रादुर्भावाशी कसलाही संबंध नसल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.