मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:47 IST)

भारताचा CoWin प्लॅटफॉर्म जगभरातल्या देशांसाठी खुला होणार

लसीकरणाची देशव्यापी मोहीम राबवण्यासाठी भारतात तयार करण्यात आलेला कोविन प्लॅटफॉर्म आता जगभरातले इतर देशही वापरू शकणार आहेत.
 
हा प्लॅटफॉर्म 'Open Source' म्हणजेच सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे
 
140 देशांचा सहभाग असणाऱ्या कोविन ग्लोबल कॉनक्लेव्हमध्ये पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
 
जगातला कोणताही देश त्यांची लसीकरण मोहीम राबवण्यासाठी त्यांच्या आरोग्ययंत्रणेच्या गरजांनुसार या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करत कोविनच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवू शकेल.बांगलादेश,भूतान,मालदीव, अफगाणिस्तान आणि गयाना या देशांनी कोविन वापरण्यात रस दाखवलाय.