बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

थायलंड बचाव कार्यात भारताचा मोठा हात, गुहेतील मुलांना सुरक्षित काढण्यासाठी भारतीय कंपनीने केली मदत

थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 खेळाडू आणि 1 कोच यांना अखेर गुहेतून बाहेर सुरक्षित काढण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये भारतीय कंपनीने आपलं सर्वश्रेष्ठ योगदान दिले आहे.   पुणे मुख्यालय असलेल्या कंपनी तज्ज्ञांनी थायलंड गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाच्या बचाव मोहिमेत तकनीकी मदत करून मोठा हातभार लावला.  
 
पुण्याची कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) प्रमाणे थायलंड स्थित भारतीय दूतावासाने थाय अधिकार्‍यांना बचाव मोहिमेत केबीएलच्या कौशल्य वापरण्याची शिफारस केली होती. नंतर कंपनीने भारत, थायलंड आणि ब्रिटनहून आपल्या तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली. उल्लेखनीय आहे की ही टीम पाणी काढण्यात तज्ज्ञ आहे.  
 
कंपनी केबीएलने सांगितले की त्यांच्या तज्ज्ञांची टीम घटनास्थळी म्हणजे गुहेजवळ पाच जुलैपासून उपस्थित होती आणि बचाव कार्य दरम्यान गुहेतून पाणी कसे काढावे, पंपाद्वारे गुहेतील पाणी कमी कसे करावे, याबाबत सल्ला देत होती.
 
केबीएलने उच्च क्षमता असलेले 4 डिवॉटरिंग पंप उपलब्ध करण्याची ऑफर केली होती. हे डिवॉटरिंग पंप महाराष्ट्राच्या किर्लोस्करवाडी प्लांटहून थायलंड एअरलिफ्ट करण्यासाठी तयार ठेवले होते. आता गुहेतील सर्व जण सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 23 जून पासून या गुहेत फुटबॉल टीमचे 12 खेळाडू आणि 1 कोच अडकलेले होते.