6 दिवसांच्या चकमकीत JCOसह आणखी 2 सैनिक शहीद, 9 सैनिकांनी आतापर्यंत बलिदान दिले

Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (22:00 IST)
जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पुंछ जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत आणखी दोन जवान शहीद झाले आहेत. शनिवारी शोध मोहिमेदरम्यान, जेसीओसह दोन सैनिकांचे मृतदेह सापडले. या 6 दिवसांच्या चकमकीत आतापर्यंत 9 सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, ज्यात 2 जेसीओ आहेत.

सोमवारी पुंछच्या सुरणकोट जंगलात ही चकमक सुरू झाली, जी नंतर राजौरीच्या थानमंडीपासून पूंछमधील मेंढरपर्यंत पसरली. गुरुवारी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झाली त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नर खास जंगल परिसरात जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले. या दरम्यान, प्राण गमावलेल्या सैनिकांची संख्या आता चार झाली आहे. याआधी, नर खास जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमन विक्रम सिंह नेगी आणि योगम्बर सिंह शहीद झाल्याची पुष्टी झाली. नेगी आणि सिंह दोघेही उत्तराखंडचे होते.
यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी पुंछच्या सुरणकोट जंगलात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केल्याने ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) पाच लष्करी जवान शहीद झाले होते. त्याच दिवशी राजौरीच्या थानामंडी जंगलात फरार दहशतवादी आणि लष्कराच्या सर्च पार्टीमध्ये चकमक झाली.

मेंढर ते थानामंडीपर्यंतचा संपूर्ण जंगल परिसर घेरण्यात आला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घेरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत दहशतवादी ठिकठिकाणी फिरत आहेत. राजौरी-पूंछ रेंजचे उपमहानिरीक्षक विवेक गुप्ता यांनी मंगळवारी सांगितले होते की, पूंछमधील सुरक्षा दलांवर हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात उपस्थित होते.
जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ भागात यावर्षी जूनपासून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. वेगवेगळ्या चकमकींमध्ये नऊ दहशतवादी मारले गेले. दरम्यान, संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, रायफलमन नेगी आणि सिंह यांचे मृतदेह शनिवारी सकाळी उत्तराखंडला विमानाने हलवण्यात आले. जवानांचे पार्थिव विमानतळावरून रस्त्याने त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल आणि पूर्ण सैन्य सन्मानासह त्यांचे अंतिम संस्कार केले जातील.
यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोविडनंतर आता जगाला मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा ...

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले

विज पडल्याने 33 जणांचा मृत्यू, पीएम मोदींनी शोक व्यक्त केले
बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

हवेतच विमानाचे इंजिन बंद

हवेतच विमानाचे इंजिन बंद
शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ...

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा
हैदराबादमध्ये 2019 मध्ये, एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या 4 आरोपींना ...

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
आजम खान 27 महिन्यांनंतर सीतापूर कारागृहातून बाहेर आले आहेत. काल म्हणजेच 19 मे रोजी ...