गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (16:56 IST)

नाचणाऱ्या वरातीत अनियंत्रित कार घुसली एकाचा मृत्यू , 31 जखमी

accident
हरिद्वार मध्ये लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या लोकांवर एका मंदधुंद स्कॉर्पिओ चालकाने गाडी टाकली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 31 व्हाराडी जखमी झाले आहेत.   
बहादराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावरील लग्नाच्या मिरवणुकीवर भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी लोकांना तुडवत गेली. या अपघातात एका बँडवाल्याचा जागीच मृत्यू झाला. तर 31 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त लोकांनी स्कॉर्पिओ चालकाला पकडून बेदम मारहाण केली.  
 
तर कारचेही नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ जाम झाला होता. माहिती मिळताच ज्वालापूर बहादराबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी नितेश शर्मा टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. वाहतूक सुरळीत करताना लोकांना समज देऊन शांत करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
 
10 जण रुग्णालयात दाखल आहेत तर एकूण 31 जखमी आहेत. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कार चालकही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
Edited By - Priya Dixit