सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (11:47 IST)

युट्युबवर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी बनवली 'पीकॉक करी', तेलंगणामध्ये आरोपींवर गुन्हा दाखल

chicken
तेलंगणा मधील एक यूट्यूबरला आता समस्यांचा सामान करावा लागत आहे. कारण असे की, त्याने पारंपरिक मोर करी रेसिपी वर एक वीडियो शेयर केला व तो वायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण सिरिसिला जिल्ह्यातील तंगल्लापल्ली मधील आहे. आरोपीवर भारताच्या राष्ट्रीय पक्षाची बेकायदेशीरपणे हत्येला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या आरोपीने आपल्या चॅनलवर 'मोर करी रेसिपी' एक व्हिडीओ अपलोड केला व यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वनअधिकारिने सांगितले की लाईक्स आणि व्ह्यूजसाठी या आरोपीने असते केले आहे. 
 
तसेच वन अधिकारींची एक टीम तंगल्लापल्ली गावात पोहचली आणि त्या व्यक्तीच्या घरातून त्याने बनवलेले चिकन जप्त करण्यात आले. 
 
तसेच या करीचा नमुना फॉरेन्सिक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून तपास सुरू आहे. रविवारी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर व्हिडिओही काढून टाकण्यात आला आहे.