रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (22:58 IST)

जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा येथे चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले

जम्मू काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. अवंतीपोरा पोलिस, आर्मी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत आहे.

अवंतीपोरा पोलिसांना नंबाल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. कडेकोट बंदोबस्त पाहताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाच्या पथकानेही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, जी दहशतवाद्यांनी नाकारली. यानंतर सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.