बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (22:11 IST)

गायिका राहत्या घरात मृतावस्थेत आढळली

हरियाणातील सोनीपत शहरातील सेक्टर-15 येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये राहणाऱ्या हरियाणवी गायिका सरिता चौधरीचा मृतदेह तिच्या घराच्या आत बेडवर आढळून आला. त्या सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रभारी होत्या. सोमवारी फोन न उचलल्याने कुटुंबीय घरी पोहोचले असता घर आतून कुलूपबंद आढळून आले. ज्यावर पोलिसांना फोन केल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. घरात गेल्यावर गायिकेचा मृतदेह आत सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हरियाणवी गायिका सरिता चौधरी (56) या सेक्टर-15 हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहत होत्या. त्यांची मुलगी बुलबुल आणि मुलगा परमवीर त्यांच्यासोबत राहतात. पतीचा आधीच मृत्यू झाला आहे. त्या सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रभारी होत्या. सरिता अनेकदा स्टेज प्रोग्राममध्ये रागनी सादर करत असे. त्यांचे गाणे लोकांना खूप आवडायचे.
कुटुंबीयांनी सोमवारी त्यांना कॉल केला. फोन न उचलल्याने घरातील सदस्य घरी पोहोचले. घर आतून बंद असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तिथे पोहोचून दरवाजा तोडला. ज्यावर सरिता घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या तोंडातून रक्त येत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.