बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली; भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

accident
पंजाबमधील सुनाम येथे गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. सर्वजण कारमधून प्रवास करत मालेरकोटलाहून सुनामकडे परतत होते. या अपघातात दीपक जिंदाल, नीरज सिंगला आणि त्यांची मुले लकी कुमार, विजय कुमार आणि देवेश जिंदाल यांचा मृत्यू झाला.
 
सर्वजण दर्ग्यातून माथा टेकून परतत होते
मिळालेल्या माहितीनुसार, मालेरकोटला येथील बाबा हैदर शाह यांच्या दर्ग्यावर दर्शन घेऊन सर्वजण सुनामला परतत होते. सुनामजवळ कारला ट्रक आणि ऑईल कॅंटरची धडक बसली. दोन्ही वाहनांमध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार कापून मृतदेह बाहेर काढले.

सुनाम दु:खात 
अपघाताची माहिती मिळताच सुनाममध्ये शोककळा पसरली. मृतांच्या नातेवाईकांनी हताशपणे अपघातस्थळाकडे धाव घेतली. घरोघरी लोकांची गर्दी झाली होती. सर्वजण शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करताना दिसले.