रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (15:58 IST)

दक्षिण काश्मीरमध्ये दगडफेक, तीन नागरिकांचा मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात तिघा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात एका मुलीचा समावेश आहे. या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत.
 
या घटनेनंतर या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांनी काही युवकांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक लोकांनी दगडफेक सुरूवात केली. दगडफेक करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना गोळीबार करावा लागला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.