गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (08:59 IST)

सिगरेट चोरली म्हणून खुनाचा प्रयत्न

गोव्यातील बागा परिसरात सिगरेट चोरली म्हणून एका आचाऱ्याने मित्राला भोसकले आहे. आपल्याकडील सिगरेट चोरली या कारणावरून आचाऱ्याने आपल्या मित्राचा चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने हे कारण सांगिलते आहे.
 
पश्चिम बंगालच्या दक्षिण दीनजपूर येथील २१ वर्षीय तरुण सैफुल सरकार हा आपल्या नेपाळी मित्रासोबत गोव्यातील बागा रिसॉर्टमध्ये आला होता. आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर गोव्यात सुटीची मजा लुटण्यासाठी आलेल्या या दोघांपैकी ग्यान बहादुर याने सैफुलची सिगरेट चोरली. या कारणावरून सैफुलला ज्ञान बहादूरचा प्रचंड राग आला. त्याने हा राग मनात धरून ठेवत ज्ञान बहादूरच्या चाकू खुपसला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
 
ही घटना घडल्यानंतर सैफुल रिसॉटवरून पसार झाला. काही वेळाने त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एकाला ग्यान बहादुर जखमी अवस्थेत सापडला. त्याने लगेच पोलिसांना माहिती देत ग्यान बहादुरला नजीकच्या गोवा मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कलंगुट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना काही दुवे सापडले.