गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 जानेवारी 2020 (13:01 IST)

नमाज पठणासाठी महिला मशिदीत जाऊ शकतात

मुस्लीम पुरुषांप्रमाणेच मुस्लिम महिलांनाही नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाण्याची परवानगी आहे, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेसुप्रीम कोर्टात सांगितले.
 
मुस्लिम महिलांना मशिदीत सर्वांसह नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका पुण्यातील बोपोडी येथील रहिवासी यास्मीन झुबेर अमहद पीरजादे व त्यांचे पती झुबेर अहमद नाझीर अहमद पीरजादे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली असून या याचिकेवरून कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला नोटीस जारी करत त्यावर उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रतिज्ञापत्रावर आपली बाजू मांडताना ऑल इंडिया मुस्लि पर्सनल लॉ बोर्डाने वरील भूमिका स्पष्ट केली. 
 
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या घटनापीठासमोर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रतिज्ञापत्र सादर करत मुस्लिम महिलांच्या मशीद प्रवेशाबाबत प्रमुख मद्यांवर आपली बाजू स्पष्ट केली आहे.
 
कोणत्याही धर्माच्या प्रथापरंपरांबाबत चौकशी करण्याची मुभा दिली जाऊ नये, असे नमूद करतानाच मलांना मशिदीत सर्वांसह नमाज अदा करणे बंधनकारक नाही, याकडे बोर्डाने लक्ष वेधले. त्याचवेळी मुस्लिम महिला मशिदीत जाऊन नमाज अदा करण्यासाठी मात्र स्वतंत्र आहे, असे बोर्डाने अधोरेखित केले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर 2018 रोजी एकआदेश देऊन केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला होता.