रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

दुर्गा मातेच्या या मंदिरांत गेल्यास पूर्ण होते मनातील इच्छा

navratri
चैत्र नवरात्रीच्या पर्वावर दुर्गा देवीची पूजा केली जाते. तसेच या पर्वावर घरात घटस्थापना केली जाते. सोबतच जावपळपासच्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. देशात अनेक प्राचीन दुर्गा माता मंदिर आहे आणि 52 देवी शक्तिपीठ आहे. जिथे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकतात. या मंदिरांमध्ये नवरात्रीमध्ये खूप गर्दी होते. अशी मान्यता आहे की, नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी मातेचे दर्शन घेतल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. 
 
वैष्णो देवी मंदिर, कटरा
जम्मू कश्मीर राज्यामध्ये माता वैष्णो देवीचा दरबार आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रमुख दुर्गा मंदिरांपैकी एक आहे. या राज्यामध्ये कटरा जिल्ह्यामध्ये त्रिकुटा पर्वतावर देवीचे मंदिर आहे. इथे देवी माता वैष्णव देवीच्या रूपात विराजमान आहे. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती पिंडीच्या रूपात त्रिकुटा पर्वतावर एका गुफेमध्ये राहते. 
 
कामाख्या मंदिर, गुवाहाटी
आसाम राज्यामध्ये गुवाहाटी शहरामध्ये नीलांचल पर्वतावर  कामाख्या मंदिर स्थापित आहे. या स्थानावर वर देवी सतीच्या शरीराचा एक भाग पडला होता. ज्यामुळे कामाख्या माता मंदिर 52 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ मानले जाते. असे मानले जाते की इथे देवी सतीचा यौनी भाग पडला होता. नवरात्रीच्या पर्वावर कामाख्या माता मंदिर मध्ये दर्शनाला जाऊ शकतात. 
 
ज्वालादेवी मंदिर, कांगडा 
हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यामध्ये ज्वालादेवी मंदिर स्थापित आहे. मान्यता आहे की, ज्वालादेवी मंदिरमध्ये दर्शन केल्याने भक्तांचे सर्व कष्ट दार होतात. या ठिकाणी देवी सतीची जीभ पडली होती. नंतर राजा भूमि चंद कटोच ने भव्य मंदिर निर्माण केले. या मंदिरात अखंड ज्योत जळत राहते. असे म्हणतात की, ज्योती स्वरूपात साक्षात दुर्गा माता इथे विराजीत आहे. ज्वाला देवीच्या दर्शनाने सर्व काम सुरळीत पार पडतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik