बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (09:11 IST)

कौतुकास्पद! शाहुनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड

शाहुनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली आहे. महिलांना सैन्य दलात भरती करून घेण्याबाबत अलीकडेच सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.त्यानुसार येथून पुढे महिलांनाही एनडीएची परीक्षा देता येणार आहे.या निर्णयानंतर आदितीच्या वायुसेनेत झालेल्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ऑक्टोबर 2020 रोजी तिने वायुसेना सामाईक परीक्षा चाचणी (एएफसीएटी) दिली होती.त्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला.या परीक्षेत संपूर्ण देशातून 240 जणांची निवड झाली.त्यात आदितीचा समावेश आहे.
 
अदिती ही मूळची चिंचवड परिसरातील शाहूनगर येथील रहिवासी आहेत.तिचं शालेय शिक्षण चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेत पूर्ण झालं आहे.यानंतर तिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील व्हीआयटीत पूर्ण केलं आहे.अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या अदितीनं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगची पदवी 80 टक्के गुणांसह मिळवली आहे.सध्या ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.‌
 
बारावीत चांगले गुण घेऊन बीटेक करण्यासाठी व्हीआयटी कॉलेज बिबवेवाडीला प्रवेश घेतला.त्यानंतर स्नातक प्रबंधन प्रवेश परीक्षा (ग्रॅज्युएट रिकार्ड एक्झामिनेशन) परीक्षेत चांगले गुण मिळवून अमेरिकेतील चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश देखील मिळवला;पण तिला देश सेवेतच रस असल्याने ही परीक्षा दिली.
 
नोकरी करतानाच तिने भारतीय सेवेतील प्रवेशाच्या परीक्षेसाठी खडतर परिश्रम घेतले आणि ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पाच दिवसांचा अवघड सेवा निवड मंडळ (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतसुद्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. 05 सप्टेंबरपासून ती हैदराबादमधील प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.