रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (09:07 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाची डी. लिट पदवी मिळाली

facebook
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देत सन्मानित करण्यात आलं आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांना पदवी देण्यात आली आहे. सामाजिक आरोग्य आणि आपत्कालीन क्षेत्रात उल्ल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना डी लिट पदवी देण्यात आली. 
 
मंगळवारी  डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्यी दीक्षांत समारोहात त्यांना डॉक्टरेट पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली आहे.
 
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मी विद्यापीठाचा आभारी आहे आपला मुलगा जिथे शिकला त्याच विद्यापीठातून डी .लिट ची उपाधी मिळणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. “खरं तर, मी यापूर्वीच डॉक्टर झालो आहे. छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे. मला डी लिटची उपाधी देण्याचं ठरवलं या साठी मी विद्यापीठाचा आभारी आहे. ” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

आपण घरात बसायचं नाही अशी शिकवण मला बाळा साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कडून मिळाली. आपल्या जबाबदारीचे पालन रोखपणे करत आहोत आणि केलं. मला “कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करता आलेनाही.ही खंत मनात होती.  बीएची पदवी तीन वर्षापूर्वी  घेतली. अजूनही पुढं शिकायचं आहे,”असंही शिंदे यांनी म्हटलं. मी जरी मुख्यमंत्री झालो तरीही मी काल देखील कार्यकर्ता होतो आणि उद्याही असणार. 
 
Edited By- Priya Dixit