शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (16:08 IST)

जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे उदघाटन झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये एखादी कला असते. कोणतीही कला असेल ती वाढवणे आवश्यक आहे. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
 
“मी जे जे स्कूल ऑफ आर्टला होतो. तीन वर्षानंतर मी शिक्षण सोडून दिलं. त्यामुळे मी ग्रॅज्युएट नाही. मला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं होतं, त्यामुळे मला माझे काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी व्यंगचित्रकला शिकलो. या क्षणापर्यंत मला कुणी विचारलं नाही की तुझ्याकडे डिग्री कोणती आहे. त्यामुळे कलेला डिग्री लागत नाही. तुमच्यामध्ये जी कोणती कला आहे, ती जोपासावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला हेरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणती कला दडली आहे हे हेरून त्याला दाखवली, तर आनंदाने ती कला तो आनंदाने पुढे घेऊन जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.