बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (18:02 IST)

बिर्याणीवरून तुंबळ हाणामारी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बिर्याणी प्रकरणाच्या वादाची पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे. पुन्हा बिर्याणी वरून पुन्हा एकदा वाद झाला आहे. बिर्याणी वरून तुंबळ हाणामारी करत टोळक्याने लोखंडीच्या सळई ने वार केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील हडपसरच्या बोराटी नगर येथे गुरुवारी रात्री घडली आहे. येथे एका केटरिंगच्या व्यवसाय करणाऱ्याला तीन जणांनी बेदम मारले आहे. या केटरिंग व्यावसायिकांवर  तीन जणांनी लोखंडी सळई ने वार केले. या तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. शुभम हनुमंत लोंढे, ऋषिकेश समाधान कोळगे आणि विनायक परशुराम मुरांगडी असे या आरोपीचे नावे आहेत. तर फिर्यादी मैनुद्दीन जलील खान फिर्यादी असून यांनी तक्रार नोंदवली आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन खान हे केटरिंग चा व्यवसाय करतात. हे बिर्याणी आणि इतर खाद्य पदार्थाची पार्सलची पुरवणी करतात. घटनेच्या दिवशी आरोपी यांच्याकडे बिर्याणी पार्सल घेण्यास आले. आणि पार्सल घेऊन पैसे न देता तसेच जाऊ लागले. खान यांनी बिर्याणीच्या पार्सलचे पैसे देण्यास सांगितले या वर तिघे आरोपीनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. नंतर आरोपींनी शिवीगाळ करायला सुरु केली. आणि त्यांच्यामधील वाद विकोपाला गेला नंतर आरोपीनी तिथेच ठेवलेल्या लोखंडाच्या सळई ने खान यांना मारहाण करायला सुरु केले. तिथे असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांना वाचविले. नंतर खान यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेतले आहे.