सरकारसोबत बोलण्यासाठी मी पुढाकार घेईन-सुप्रिया सुळे
पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत.नुकतीच स्वप्निल लोणकरच्या घरी जाणून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी स्वप्निलच्या वडिलांना अश्रू अनावर झाले."लोणकर कुटुंबांना शासन मदत करणारच आहे. मात्र आम्ही देखील त्यांना जो काही सपोर्ट लागेल तो करणार आहोत",असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
विद्यार्थ्यांनी इतक्या टोकाची भूमिका न घेता चर्चेतून प्रश्न सोडवावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडलीच आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र सरकारसोबत बोलण्यासाठी मी पुढाकार घेईन आणि यावर नक्कीच मार्ग निघेल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.