बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:32 IST)

पीएमपीएमएलमध्ये केवळ सीटवर बसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्यास मुभा

पीएमपीएमएलमध्ये केवळ सीटवर बसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्यास मुभा असेल. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बसमध्ये आसन क्षमते इतकेच प्रवासी सामावून घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला. येेत्या सोमवारपासून) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक उपाय म्हणून पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रवासी संख्येवर मर्यादा आणण्याचे सुचविले होते. त्यानुसार पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
 
बसची सरासरी आसन क्षमता 32 ते 34 आहे. तेवढेच प्रवासी बसमध्ये घ्यावेत, अशा सूचना वाहक-चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच मास्कशिवाय बसमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या सुस्थितीत असतील, याचीही खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसमधील प्रवासी संख्या कमी केल्यामुळे गर्दीच्या वेळात प्रमुख मार्गांवर सोमवारपासून 50 बस वाढविण्यात येणार आहेत. तसेच गरज भासल्यास आणखी 20 बस वाढविण्यात येतील.