रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (18:06 IST)

महाराष्ट्र बँकेत भरदिवसा दरोडा, 2 कोटींच्या सोन्यासह 31 लाखांवर डल्ला

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे गुरुवारी आज दुपारी दीडच्या सुमारास दरोडा पडला. भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पाच दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लॉकरच्या चाव्या घेतल्या. २ कोटी रुपयांचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम पोत्यात भरून बाहेरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारने पिंपरखेड गावातून वेगात गाडी घेऊन पसार झाले. वाहनाला प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी काळे जर्किंग डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावल्याचे दिसून येत आहे.
 
यावेळी कर्मचारी यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. या घटनेची माहिती शिरूर पोलीसांना मिळाल्यानंतर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.