रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (08:02 IST)

पुण्यातील पतसंस्थेच्या अध्यक्षाची आत्महत्या; उपाध्यक्षासह 7 सभासदांवर गुन्हा

Suicide of Pune credit union president; Crime on 7 members including the vice president Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
सभासदांचे पैसे देण्यास दबाव टाकून घेतलेले पैसे व्याजासह परत करण्यासाठी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष आणि सभासदांनी अध्यक्षांना त्रास दिला.या त्रासाला वैतागून पतसंस्थेचे अध्यक्ष हरीशचंद्र खंडु भरम  (वय-61 रा. निगडी गावठाण) यांनी आत्महत्या  केली. भरम यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी 7 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब काठथवटे, विजय तिकोणे, जुबेर शेख, शकिल मन्यार,आश्मा शेख, मेजर सय्यद, चंद्रकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी हरीशचंद भरम यांची मुलगी कांचन अमित नाईक (वय-34 रा.अथर्वपुर्व सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिशचंद्र भरम हे कसबा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष होते.अध्यक्ष असताना आरोपी उपाध्यक्ष व सभासद यांनी संगनमत करुन भरम यांना सभासदांनी गुंतवलेले पैसे देण्याचा तगादा लावला.तसेच विजय तिकोणे याने घेतलेले 5 लाख रुपये भरम यांच्या नावावर घेतल्याचे सांगून आरोपींनी पैसे व्याजासह परत करण्यास सांगितले.

पैसे देण्यासाठी मयत भरम यांना वेळोवेळी फोन करु धमकी  देऊन मानसिक त्रास दिला. आरोपींच्या त्रासाला वैतागून हरीशचंद्र भरम यांनी आत्महत्या केली.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.