मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (13:41 IST)

जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

लोणावळाच्या रहिवाशांनी जुन्या पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको मुळे महामार्ग रोखला आहे हा रास्ता रोको त्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत दैनंदिन होणाऱ्या वाढीमुळे आक्रामक होऊन करण्यात आला आहे. या मुळे वाहतूक खोळंबली आहे. नागरिकांकडून शहरातून जाणाऱ्या मार्गांच्या रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यात कोरोनासाठी लावण्यात आलेले निर्बंध काढण्यात आले आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळा येतात. अशा वेळी या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करावे अशी मागणी वारंवार नागरिकांकडून केली जात असून देखील आयआरबी आणि एमएसआरडीसी कंपन्यांनी काहीच दखल घेतली नाही. त्यावरून संतापून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.