पाण्याने भरलेल्या बादलीत पडून 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
नाशिक- एका धक्कादायक घटनेत पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील बंदावणे मळा परिसरात ही घटना घडली आहे. भिकाजयसिंग यांचा लहान मुलगा श्रीरीश सकाळी उठल्यानंतर घरातील खोलीत असलेल्या बाथरुममध्ये गेला आणि तेव्हा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला. घरातील लोकांना हा प्रकार समजता त्यांनी श्रीरिशला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.