सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (10:18 IST)

Accident : कार वरील नियंत्रण सुटून अपघातात एकाचा मृत्यू, तीन जखमी

जळगावातील शिरसोली मार्गावरून जळगावकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटून कार झाडाला आदळून अपघात झाला. या अपघातात एका तरुणही मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
सुटीचा दिवस असल्याने चार मित्र वाहनाने हॉटेलसाठी जेवायला गेले असता जळगावला परतताना कार वरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. 
आनंदा शांताराम सोनावणे असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

हे चौघे मित्र रविवारी 14 जुलै रोजी शिरसोली गावाजवळ एका हॉटेलात जेवण करायला गेले. जेवून ते शिरसोलीतुन जळगाव कडे परतताना दुपारी चारच्या सुमारास देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्तेच्या कडेला झाडाला जाऊन आदळली आणि या धडकेमुळे कारच्या बोनेटचे नुकसान झाले. या अपघात आनंद सोनावणे जागीच मरण पावला तर तिघे गंभीर जखमी झाले. 

वाहन चालक आणि ग्रामस्थांनी जखमींना कार मधून बाहेर काढले. आणि त्यांना एका खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल होण्यासाठी पाठविले. अपघाताची माहिती मिळतातच रुग्णालयात मित्रांची आणि कुटुंबीयांची गर्दी झाली.  

Edited by - Priya Dixit