शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू - अमित शहा

आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा  उत्तर प्रदेशात जिंकू मात्र त्या कदापि  ७२ होऊ देणार नाही. मात्र मला तुम्ही  महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत. त्यांना पळून लावू  आणि जी जागा ४५ वी असेल ती बारामतीची असेल अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाआघाडीला लक्ष्य केले आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले आदी  पदाधिकारी उपस्थित होते.
 
अमित शहा पुढे  म्हणाले की, देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी होतेय,  त्याकडे पाहून हे कसले गठबंधन, हे तर सगळे राज्यातले नेते आहे. महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळ्ताय बोलावले. तर कोणी ऐकायला  येईल का ? या शब्दात महाआघाडी मधील नेत्यावर सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आले तर आपण अनेक  वर्ष मागे प्रगतीपासून मागे जानरा आहोत, हे काँग्रेसवाले जाती धर्मात तेढ निर्माण करतात,  त्यामुळे विकास हवा असेल तर  भाजपला साथ दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहे. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मात्र आमचे सरकारने पारदर्शक कारभार करीत आहे, आम्ही भ्रष्ट्राचार नष्ट केला आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.