सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (10:40 IST)

केंद्र सरकार देशाचं संविधान बदलू पाहत आहे - प्रकाश आंबेडकर

"केंद्र सरकार देशाचं संविधान बदलवू पाहत आहे. देशात नवीन संविधान आल्यानंतर येणाऱ्या हुकूमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही", अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
 
आंबेडकर अकोला येथे धमचक्र प्रवर्तन दिनाच्या ऑनलाईन सभेत बोलत होते. देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देशात होणाऱ्या घटना कल्पनाशक्तीच्या बाहेर राहतील. त्यामुळे आपण सर्वांनी जागृत असायला हवं असं आंबेडकर यावेळी म्हणाले.